रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

राज्यातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची योजना - १६ ऑक्टोबर २०१७

राज्यातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची योजना - १६ ऑक्टोबर २०१७

* राज्यातील १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याच्या गेल्यावर्षीपासून घोषणा सुरु आहेत. अखेरीस त्याच्या अंमलबजावणीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले असून या शाळांसाठी स्वतंत्र परीक्षा मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. 

* या शाळांना ओजस शाळा व तेजस शाळा अशी आंतरराष्ट्रीय मानकानुसार ठरवण्याचा निर्णय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेत घेण्यात आला आहे. 

* त्यासाठी राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहेत. या चाचण्यांची तयारी करण्यासाठी १०० शाळांची निवड करण्यात आली आहे. 

* सुरवातीला प्रत्येक विभागात एक अशा दहा शाळांची निवड करण्यात येणार आहे. या दहा शाळांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यांना [ओजस शाळा] अशी नाव मिळेल. बाकीच्या नव्वद शाळासाठी ओजस शाळा मार्गदर्शनाची भूमिका बजावतील. 

* सिंगापूर, दक्षिण कोरिया, चीन, जपान, या देशातील पद्धतीची माहिती आणि प्रशिक्षण या शाळांना देण्यात येणार आहे. 

* प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रिडींग लिटरसी स्टडी ही दर पाच वर्षांनी घेण्यात येणारी भाषेवरील चाचणी, ट्रेंड्स इन इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स अँड सायन्स स्टडी अशा प्रकरणे गणित व विज्ञान च्या चाचणीद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.