बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या आर्थिक कामाचा लेखाजोखा सरकार कडून सादर - २५ ऑक्टोबर २०१७

केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या आर्थिक कामाचा लेखाजोखा सरकार कडून सादर - २५ ऑक्टोबर २०१७

* नोटबंदी, जीएसटी यांसारखे महत्वाचे केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यासंदर्भात भारतातील भविष्यातील आर्थिक प्रगती आणि सरकारने केलेले तीन वर्षाच्या आर्थिक कार्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लेखाजोखा सादर केला.

* जेटलींच्या सादर केलेल्या सर्वेक्षणाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.

* तीन वर्षात महागाई कमी झाली.
* जागतिक पातळीवर भारताचा आर्थिकविषयक विश्वास वाढला आणि भारतासोबत आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थैर्य टिकवण्यात जगातील सर्व देश पुढे येत आहेत.
* जीएसटी ही सर्वात मोठी आर्थिक सुधारणा त्यामुळे भारताचा विकास सर्वात वेगाने होईल.
* सीमाभागात पायाभूत सुविधा वाढविण्यावर सरकारचा भर.
* गेल्या तीन वर्षात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा जीडीपी दर सरासरी ७.५% राहिला.
* परकी गुंतवणूक वाढून ४०० अब्ज डॉलरवर.
* चालू खात्यावरील तूट नियंत्रणात, सध्या दोन टक्क्यापेक्षा कमी.
* केंद्र सरकारच्या जीईएम पोर्टलवर एमएसएमईच्या नोंदणी प्रक्रिया वेगवान करणार.
भारतमाला महामार्ग प्रकल्पाअंतर्गत देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणाऱ्या ३४,००० किलोमीटर नवीन मार्गासह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी .९२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह २०२२ पर्यंत ८७ हजार ६७७ किलोमीटर रस्त्यांचा विकास आणि विस्तार आजवरच्या सर्वात मोठया योजनेवर मंजुरीसह शिक्कामोर्तब केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.