मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

प्रसिद्ध साहित्यिक डॉ शहा यांचे निधन - ११ ऑक्टोबर २०१७

प्रसिद्ध साहित्यिक डॉ शहा यांचे निधन - ११ ऑक्टोबर २०१७

* थोर विचारवंत तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ मुरलीधर बन्सीलाल शहा यांचे ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. शहा यांनी हिंदी, साहित्य, राष्ट्रभाषा प्रचार राष्ट्रसेवादल समाजवादी चळवळी, नर्मदा बचाव महात्मा गांधी तत्वज्ञान संस्था या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.

* त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

* हिंदी भाषा आणि साहित्य तसेच गांधीजींच्या विचारांचा प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले आहे.

* अमृता प्रीतम यांच्या [रसिदी टिकट] पुस्तकाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद विशेष गाजला. याशिवाय त्यांनी [खानदेशचे गांधी - बाळूभाई मेहता, सत्यशोधक कुंभार गुरुजी, श्यामची आई, नाट्य रूपांतर, यदुनाथ थत्ते चरित्र, निबंध कौमुदी, संस्कृती, अक्षरयात्रा, यासारख्या पुस्तकाचे लेखन केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.