शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

जीएसटीच्या २२ व्या परिषदेतील काही महत्वपूर्ण निर्णय - ७ ऑक्टोबर २०१७

जीएसटीच्या २२ व्या परिषदेतील काही महत्वपूर्ण निर्णय - ७ ऑक्टोबर २०१७

* जीएसटीच्या २२ व्या परिषदेतील काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. दीड कोटींचा टर्नओव्हर असणाऱ्या व्यापाऱ्यांना आता दर महिण्याऐवजी ३ महिन्यांची जीएसटी रिटर्न भरावा लागणार आहे.

* २ लाखापर्यंत सोने खरेदीला पॅनकार्डची गरज लागणार नाही. एप्रिल २०१८ पासून इ-वॉलेट ची अंमलबजावणी.

* १ कोटी ५० लाखापर्यंत वार्षिक उलाढाल असणारे व्यापारी ३ महिन्यांनी जीएसटी रिटर्न भरू शकतात.

* ७५ लाखापर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना कंपोझिशन स्कीमअंतर्गत १% टॅक्स देऊन रिटर्न भारण्यातून सूट होती. ही ७५ पासून १ कोटी वाढवण्यात आली आहे.

* यापुढे ५० हजारापर्यंत व्यवहारासाठी पॅनकार्डची अट काढून टाकण्यात आली आहे. ५० ते २ लाखापर्यंत व्यवहारासाठी मात्र पॅनकार्ड बंधनकारक असेल.

* नॉन रजिस्टर्ड डिलरकडून मालाची खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांना भुर्दंड आता पडणार नाही. ३१ मार्चपर्यंत रिव्हर्स मॅकेनिजमला स्थगिती देण्यात आली आहे.

* ५० हजारापर्यंतच्या जेम्स, ज्वेलरी खरेदीसाठी पॅन कार्ड आवश्यक असल्याचा नियम काढून टाकण्यात आला आहे. मात्र २ लाखापर्यंत जेम्स, ज्वेलरी, प्रिशिएश स्टोन खरेदीवर पॅन कार्ड आवश्यक असेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.