बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

राज्य सरकार निर्णय - जात प्रमाणपत्राला रक्ताचे नाते पुरेसे - ४ ऑक्टोबर २०१७

राज्य सरकार निर्णय - जात प्रमाणपत्राला रक्ताचे नाते पुरेसे - ४ ऑक्टोबर २०१७

* वडिलांच्या अथवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मिळालेल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर पाल्यासही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

* जातीच्या दाखल्यासाठी सध्या एससीसाठी अर्जदाराला १९५० पूर्वीचा, व्हीजेएनटीसाठी १९६१ पूर्वीचा वास्तव्याचा पुरावा लागतो. वडिलांचे जात प्रमाणपत्र असतानाही पाल्याना सर्व पुरावे सादर करावे लागत होते.

* आता वडिलांकडील रक्तातील नातेसंबंधातील व्यक्तीकडे [ जसे वडील, भाऊ,सख्खे चुलत भाऊ व इतर] असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे डिजिटल लॉकर संकल्पना राबविण्यात येईल.

* वडिलांच्या रक्तातील नात्यातील व्यक्तीच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे संकलन त्यात केल्याने प्रक्रिया गतिमान होणार आहे. १५ दिवसात अर्जदाराविषयी आक्षेप नोंदविले नसल्यास त्यास जात प्रमाणपत्र देण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.