शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

सरकारने पीपीएफ, राष्ट्रीय बचत पत्र, पोस्टासाठी आधार बंधनकारक - ८ ऑक्टोबर २०१७

सरकारने पीपीएफ, राष्ट्रीय बचत पत्र, पोस्टासाठी आधार बंधनकारक - ८ ऑक्टोबर २०१७

* अर्थमंत्रालयाने एक अध्यादेश जारी केला असून सरकारने पीपीएफ, राष्ट्रीय बचत पत्र, पोस्टासाठी आधार बंधनकारक झाले आहे. त्यामुळे आता पोस्ट खात्यातील सर्व खात्याना आधार कार्डशी लिंक करावे लागले.

* त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सरकारने सर्व पोस्ट ऑफिस कार्यालयांना याबाबतचे आदेश दिले आहेत.

* याशिवाय केंद्र सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड [पीपीएफ], नॅशनल सेविंग्स स्कीम[एनएससी] आणि किसान विकास पत्र [केविपी] साठीही आधार क्रमांक अनिवार्य केला आहे.

* सध्या देशात दीड लाख पोस्ट ऑफिस आहेत. लहान शहर आणि ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमधील खात्यामध्ये कॅश डिपॉझिटच प्रमाण जास्त आहे.

* केंद्र सरकारने विविध स्कीम आणि सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी आधार नंबर मिळवण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढविली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.