बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

जोयिता मोंडल भारताच्या पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश - १९ ऑक्टोबर २०१७

जोयिता मोंडल भारताच्या पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश - १९ ऑक्टोबर २०१७

* तृतीयपंथी म्हटले की आजही अनेकांच्या भुवया काहीशा उंचावतात. भीक मागून त्रास देणारे आणि पैसे नाही दिले तर चिडचिड करणाऱ्या व्यक्ती अशी आपल्या मनात त्यांच्याबद्दलची प्रतिमा असते.

* २९ वर्षाच्या जोयिता मोंडल यांनी जुलै महिन्यात न्यायाधीशाची सूत्रे स्वीकारली होती. त्या सध्या उत्तर दिनाजपूर येथील इस्लामपूर न्यायालयाच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विद्वान न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत.

* कोलकातामध्ये होणाऱ्या भेदभावाला कंटाळून त्यांनी आपले शहर सोडले. त्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आल्या. त्यांनी मुक्त विद्यापीठातून कायद्याचे पदवी शिक्षण प्राप्त केले.

* तृतीयपंथी असल्याने हॉटेलमध्ये प्रवेश नाकारलेल्या ज्योयीता न्यायालयाजवळील एका बसस्टॉपवर झोपायच्या त्याच न्यायालयात त्या आता न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.