सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

जगात कार्बन उत्सर्जनात विक्रमी वेगाने वाढ - ३१ ऑक्टोबर २०१७

जगात कार्बन उत्सर्जनात विक्रमी वेगाने वाढ - ३१ ऑक्टोबर २०१७

* पृथ्वीवरील वातावरणातील कार्बन डायऑकसाइड प्रमाण २०१६ या वर्षात विक्रमी वेगाने वाढले असून त्यामुळे भविष्यात तापमानात तीन अंश सेल्सिअसची वाढ होऊन समुद्र पातळीत वीस मीटरने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

* अशी माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान संघटनेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. २०१६ या वर्षात वातावरणात कार्बन डायऑकसाइड ज्या प्रमाणात वाढला असे लाखो वर्षात कधी झाले नाही

* हरित वायूमधील हवेतील प्रमाण २०१५ मध्ये ४०० पीपीएम हेच प्रमाण २०१६ मध्ये ४०३ पीपीएम झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे

* कोळसा, तेल, सिमेंट, आणि जंगलतोड, यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण २०१६ मध्ये वेगाने वाढले असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे

* जग हे हिमयुगातून बाहेर येत असताना वातावरणातील कार्बन वाढीच्या वेगापेक्षा सध्याच्या वेग शंभरपटींनी अधिक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.