मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

व्यवसाय सुलभतेच्या यादीत भारत जगात १०० व्या स्थानी - १ नोव्हेंबर २०१७

व्यवसाय सुलभतेच्या यादीत भारत जगात १०० व्या स्थानी - १ नोव्हेंबर २०१७

* जागतिक बँकेच्या जाहीर करण्यात येणाऱ्या व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्देशांकात १९० देशांच्या यादीत भारताने यंदा शंभरावे स्थान पटकावले आहे.

* गतवर्षीच्या भारताच्या मानांकनात यंदा ३० अंकांनी सुधारणा झाली आहे. तसेच हा निर्देशांक ठरवताना भारतातील मुंबई व दिल्ली या दोन शहरातील परिस्थिती प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली आहे.

* भारत आता व्यवसाय करण्यासाठी अधिक सज्ज झाला आहे. तो आता जगातील अन्य देशांशी व्यवसाय करण्यासाठी अधिक सज्ज आणि खुला झाला आहे.

* जागतिक बँकेचे उपाध्यक्ष ऍनेट डिक्सन यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले की भारतात पतपुरवठा आणि बांधकाम परवान्याच्या क्षेत्रात झालेली सुधारणा.

* गेल्या वर्षभरात नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर यामुळे भारतातही सर्वच क्षेत्रात वृद्धी पाहण्यास मिळणार असून भारत वेगाने विकसित होण्यासाठी सज्ज आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.