शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

जगभरातील सेफ सिटीत मुंबई ४५ व्या स्थानावर - १५ ऑक्टोबर २०१७

जगभरातील सेफ सिटीत मुंबई ४५ व्या स्थानावर - १५ ऑक्टोबर २०१७

* दि इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्सी युनिटने [सेफ सिटी इंडेक्स] अंतर्गत जगभरातील सुरक्षित ६० शहरांचा अभ्यास केला असून यामध्ये प्रचंड गजबजलेल्या आणि पायाभूत सुविधांचा वनवा असलेली मुंबई जगातील सर्वाधिक सुरक्षित ६० शहरामध्ये ४५ व्या स्थानावर आहे.

* तर याच सर्व्हेमध्ये देशाची राजधानी दिल्ली ४३ व्या क्रमांकावर आहे. [सेफ सिटी इंडेक्स] मध्ये ६० शहरांचा एकूण ४९ वेगवेगळे पॅरामीटर लावण्यात आले.

* त्यात डिजिटल सुरक्षा, पायाभूत सुरक्षा यांचाही प्रामुख्याने समावेश होता. ही शहरे त्या त्या देशातील आर्थिक केंद्र असून छोट्या गावातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येथे येतात.

* या सर्व्हेत जपानचे टोकियो शहर अव्वल स्थानी राहिले असून सिंगापूर दुसऱ्या आणि जपानचे ओसाका शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.