रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

झारखंडमध्ये गायींना हेल्थ कार्ड - १५ ऑक्टोबर २०१७

झारखंडमध्ये गायींना हेल्थ कार्ड - १५ ऑक्टोबर २०१७

* गायीच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या [पशुधन संजीवनी] योजनेअंतर्गत झारखंडमध्ये १५ लाखाहून अधिक गायीचे लवकरच हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे.

* केंद्राच्या पशुधन योजनेअंतर्गत प्रत्येक गायी आणि म्हशींची प्रजनन क्षमतेची नोंद ठेवणारे झारखंड हे देशातील पहिले राज्य आहे.

* गोवंशाची अवैध वाहतूक रोखणे, त्याची दूध क्षमता वाढविणे, त्याच्या आरोग्याची नोंद ठेवणे हे योजनेचे मुख्य उद्देश आहेत.

* झारखंडमध्ये सुमारे ४१.९४ लाख गायी आहेत. यापैकी १५ लाख दुभत्या गायींसाठी १८ जनावरांचा पहिल्या टप्प्यात हेल्थ कार्ड देण्यात येणार आहेत.

* या पशुधन संजीवनी योजनेसाठी केंद्र सरकारने यापूर्वी १.५७ कोटी रुपयाची तरतूद केली होती. तर झारखंड सरकारने या योजनेसाठी १.०४ कोटी रुपये दिले आहेत.

* केंद्राच्या [Information Network for Animal Productivity and Health - INAPH] या योजनेअंतर्गत हे क्रमांक देण्यात आले आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.