शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

१.२ भारतीय अर्थव्यवस्थेचे नियोजन

१.२ भारतीय अर्थव्यवस्थेचे नियोजन

* नियोजनाची व्याख्या - आर्थिक नियोजन म्हणजे पूर्वनियोजित उदिष्ट्ये साध्य करण्यासाठी संसाधनाच्या मालकांनी जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय, आर्थिक क्रियांना जाणीवपूर्वक दिलेली दिशा होय.

* संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पाहणीनंतर, आढावा घेतल्यानंतर शासनाने मूलभूत आर्थिक प्रश्नासंबंधी घेतलेले निर्णय अथवा उपलब्द साधनसंपत्तीचे विविध क्षेत्रात वाटप होय.

नियोजनाची विविध उद्दिष्ट्ये आणि गरज

* राष्ट्रीय उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ करणे.
* दरडोई उत्पन्नात वाढ करणे.
* पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण करणे.
* संपत्तीच्या असमान वाटपाची समस्या सोडविणे.
* समानता, सामाजिक न्याय यावर आधारित असलेली समाजवादी समाजरचना निर्माण करणे.
* लोकसंख्यावाढीवर नियंत्रण प्रस्थापित करणे. कुटुंबनियोजन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबाजवणी करणे.
* प्रादेशिक विकासातील असमतोल कमी करणे.
* अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविणे.
* आर्थिक विकासाचे लाभ समाजातील सर्व स्तरावर मिळतील असे पाहणे.
* पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातील जनतेला उपलब्द करणे. ग्रामीण भागाचे व खेड्यांचे विद्युतीकरण करणे.

१.२.१ नियोजनाचे विविध प्रकार

* अल्पकालीन नियोजन/दीर्घकालीन नियोजन - कालावधीनुसार नियोजनाचे २ प्रकार पडतात अल्पकालीन नियोजन साधारण एक ते तीन वर्षाचे असते. तर दीर्घकालीन नियोजन त्यापेक्षा जास्त कालावधीकरीता असते.

* केंद्रित नियोजन - संपूर्ण राष्ट्रांचे हित डोळ्यासमोर ठेवून व्यापक दृष्टीने विचार करून हे नियोजन केल्या जाते. याला केंद्रीय नियोजन असे म्हणतात.

* विकेंद्रित नियोजन - या नियोजन प्रकारात राष्ट्रीयदृष्ट्या सर्व महत्वाचे निर्णय मुख्य मध्यवर्ती सत्ता घेते. त्याला विकेंद्रित नियोजन असे म्हणतात.

* हुकूमशाही नियोजन - हुकूमशाही याचा अर्थ राजकीय आणि आर्थिक सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात एकवटलेली दिसते.

* लोकशाही नियोजन - लोकशाही देशात विकेंद्रित स्वरूपात असणारे नियोजन असा या नियोजनाचा अर्थ सांगितलं जातो. नियोजनाची कार्यवाही करताना लोकशाही तत्वाचा वापर केला जातो.

* रचनात्मक नियोजन - दर वेळी नवीन रचना करण्याचा प्रयत्न या नियोजनात असतो. अर्थव्यवस्थेचे सध्या असलेले प्रचलित स्वरूप बदलले जाते.

* कार्यात्मक नियोजन - ज्या नियोजनाचा हेतू समाजाची, अर्थव्यवस्थेची रचना आहे तशीच टिकवून ठेवण्याचा असतो. त्या वेळी त्याला कार्यकारी नियोजन असे म्हणतात.

* साखळी नियोजन - तरती योजना, प्रवाही अथवा सरकती योजना अशी या पर्यायी स्वरूपाची नावे आहेत.

* आदेशात्मक नियोजन - मध्यवर्ती नियोजन मंडळ आदेश देते आणि त्यानुसार विविध उत्पादनसामुग्री त्या क्षेत्राकडे वळविली जाते. या पद्धतीला आदेशात्मक नियोजन असे म्हणतात.

* प्रेरित नियोजन - प्रेरणा देऊन सहकार्यास प्रवृत्त करून या प्रकारचे नियोजन केले जाते. उत्पादनाची साधने विविध क्षेत्राकडे वळविली जाते.

* प्रादेशिक नियोजन - या प्रकारचे नियोजन एखाद्या विशिष्ट भागासाठी जिल्हा पातळीवर, स्थानिक पातळीवर असते.

* राष्ट्रीय नियोजन - संपूर्ण देशाचा विचार यात अंतर्भूत असतो त्याला राष्ट्रीय नियोजन असे म्हणतात. ही संकल्पना जास्त व्यापक स्वरूपाची आहे.

* आंतरराष्ट्रीय नियोजन - भौगोलिक क्षेत्रफळानुसार हा नियोजनाचा तिसरा प्रकार आहे. या नियोजन प्रकारालाच जागतिक पातळीवरचे नियोजन असे दुसरे नाव देण्यात आले आहे.

* भांडवलशाही नियोजन - प्रत्येक देशात शासनाचा प्रकार कोणता आहे. त्यानुसार नियोजनाचे भांडवलशाही, समाजवादी, संमिश्र स्वरूपाचे नियोजन असे तीन प्रकार पडतात.

* समाजवादी नियोजन - उत्पादन साधनांची मालकी सामूहिक, नफ्याची प्रेरणा नाही, सरकारचा व्यापक हस्तक्षेप अशी वैशिष्ट्ये ज्या नियोजनात आहेत. त्याला समाजवादी नियोजन म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.