सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१७ रिचर्ड थेलर यांना जाहीर - १० ऑक्टोबर २०१७

अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१७ रिचर्ड थेलर यांना जाहीर - १० ऑक्टोबर २०१७

* यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना मिळाला आहे. व्यावहारिक अर्थशास्त्राच्या योगदानाबद्दल थेलर यांचा सन्मान करण्यात आला.

* त्यांना वर्तनवादी वित्त विषयातील [बिहेव्हिरल इकॉनॉमिक्स] च्या योगदानाबद्दल आर सनस्टीन यांच्यासह लिहिलेल्या [नज] या प्रसिद्ध पुस्तकात थॅलर यांनी वर्तनवादी अर्थशास्त्राचा आढावा घेत समाजातील समस्यांवर प्रकाश टाकला.  

* अर्थशास्त्राच मानसशास्त्र समजून सांगण्यात थेलर यांचा हातखंडा आहे. त्याबद्दलही नोबेल समितीने थेलर समितीने यांची निवड केली आहे. 

* १९४५ साली जन्मलेल्या रिचर्ड थेलर यांना वयाच्या ७२ व्या वर्षी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. आर्थिक समस्या कशा दूर होतील, याबाबत रिचर्ड थेलर यांनी सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं आहे. 

* हे सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे. वैयक्तिक निर्णय क्षमतेचं आर्थिक आणि मानसशास्त्रीय विश्लेषण यांच्यातील दुवा म्हणून रिचर्ड थेलर यांचं काम मोठं आहे. 

* आर्थिक कुवत आणि मानसिक स्थिती यांच्यातील मानवी संभ्रमावस्थेत रिचर्ड थेलर यांनी केलेलं विश्लेषण हे आर्थिक क्षेत्रात प्रमाण मानण्यात येत. 

* यंदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय रिझर्व्ह बँक माजी गव्हर्नर रघुराम राजनही होते. त्यामुळे या पुरस्काराकडे देशाचे लक्ष लागले होते. 

* दरम्यान १९९८ मध्ये भारताचे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.