सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

सिंगापूर पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली - २९ ऑक्टोबर २०१७

सिंगापूर पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली - २९ ऑक्टोबर २०१७

* ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स माहितीनुसार सिंगापूरच्या पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट ठरला आहे.

* जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत १९३ देशाच्या पासपोर्टची एकमेकांशी तुलना केली गेली. यामध्ये सिंगापूर पहिल्या, जर्मनी दुसऱ्या तर स्वीडन आणि दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानी आले.

* यामध्ये भारताच्या क्रमांकात सुधारणा झाली असून यापूर्वीच्या ७८ क्रमांकावरून त्याने ७५ व्या क्रमांकावर झेप घेतली.

* या यादीतील पहिल्या १० क्रमांकावर युरोपियन देशाचच प्रभुत्व असायचे. परंतु यंदा पहिल्यांदाच आशियाई देशांनी या यादीत स्थान मिळविले आहे.

* गेल्या काही वर्षांपासून नागरिक एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करत असून काही अंशी त्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

* सिंगापूरमधील नागरिकांना १५९ देशांचा व्हिसा सहजरित्या मिळू शकतो. त्यानंतर जर्मनीतल्या नागरिकांना १५८ देशांचा व्हिसा उपलब्द होतात.

* स्वीडन आणि दक्षिण कोरियातील नागरिकांना १५७ देशाचे व्हिसा सहज देण्यात येतो. तर भारतातील नागरिकांना ५१ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात.

* गेल्या २ वर्षांपासून या स्पर्धेत जर्मनी सातत्याने पहिला क्रमांक राखून होती, परंतु यंदा त्या देशाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.