गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

साहित्यक्षेत्राचा २०१७ नोबेल पुरस्कार काझुओ इशिग्युरो यांना जाहीर - ६ ऑक्टोबर २०१७

साहित्यक्षेत्राचा २०१७ नोबेल पुरस्कार काझुओ इशिग्युरो यांना जाहीर - ६ ऑक्टोबर २०१७

* प्रसिद्ध ब्रिटिश लेखक काझुओ इशिग्युरो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल जाहीर झाला आहे. [द रिमेन्स ऑफ द डे] या प्रसिद्ध कादंबरीचे ते लेखक असून या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

* स्वीडिश अकादमीचे काझुओ यांचा परिचय करून देताना, ज्यांनी उत्कृष्ट भावनिक कादंबऱ्यांमध्ये जगाशी जोडल्या गेलेल्या आपल्या भ्रामक अर्थाचा उलगडा केला आहे.

* काझुओ यांचे बहुतांश लेखन आठवणी, काळ, या गोष्टीवर आधारित आहे. त्यांनी एकूण ८ पुस्तके लिहिली आहेत. शिवाय चित्रपट दूरचित्रवाणी, पटकथा लेखनही केले आहे.

* त्यांची [द रिमेन्स ऑफ द डे] ही कादंबरी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. सर्वाधिक वाचली गेलेली ही त्यांची कादंबरी १९८९ साली प्रसिद्ध झाली.

* इशिग्युरो यांचा जन्म जपानमधील नागासाकी येथे ८ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. १९६० साली त्यांचे संपूर्ण कुटुंब ब्रिटनला स्थायिक झाले.

* १९७४ मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ केंटमध्ये उच्च शिक्षणास सुरवात केली. इंग्रजी आणि तत्वज्ञान या विषयात त्यांनी १९७८ मध्ये बॅचलर ऑफ आर्टस् [ओनर्स] पदवी मिळविली.

* काझुओ इशिग्युरो यांना १९८९ मध्ये [द रिमेन्स ऑफ द डे] साठी बुकर पुरस्काराने गौरव झाला आहे. तर २००५ मध्ये जगप्रसिद्ध टाइम मॅगझिनने [ नेव्हर लेट मी गो ] साठी सर्वोत्कृष्ट १०० इंग्रजी लेखऑफ द कांमध्ये त्यांना स्थान दिले आहे.

* इशिग्युरो याचे लेखन साहित्य - अ पेले व्ह्यू ऑफ हिल्स १९८२, ऍन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड १९८६, द रिमेन्स ऑफ द डे १९८९, द अनकन्सकोल्ड १९९५, व्हेन वी वेअर ऑर्फन्स २०००, नेव्हर लेट मी गो २००५, द ब्लुरिड जायंट २०१५0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.