बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

भारतमाला प्रकल्प - रस्तेबांधणीसाठी केंद्र सरकारचा आजपर्यंतचा सर्वाधिक खर्च प्रकल्प - २५ ऑक्टोबर २०१७

भारतमाला प्रकल्प - रस्तेबांधणीसाठी केंद्र सरकारचा आजपर्यंतचा सर्वाधिक खर्च प्रकल्प - २५ ऑक्टोबर २०१७

* भारतमाला महामार्ग प्रकल्पाअंतर्गत देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणाऱ्या ३४,००० किलोमीटर नवीन मार्गासह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ६.९२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह २०२२ पर्यंत ८७ हजार ६७७ किलोमीटर रस्त्यांचा विकास आणि विस्तार आजवरच्या सर्वात मोठया योजनेवर मंजुरीसह शिक्कामोर्तब केले आहे.

* गुजरात विधानसभा आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने केलेली ही सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण घोषणा होय.

* या प्रकल्पात आर्थिक घडामोडीला चालना देत देशभरात येत्या पाच वर्षात किमान १४.२ कोटी मनुष्यदिन रोजगार निर्माण होतील.

* भारतमाला महामार्ग प्रकल्पात एका सल्लागार संस्थेने ४४ आर्थिक विशेष महामार्ग निश्चित केले आहे. तसेच या वर्षाच्या सुरवातीला पंतप्रधान कार्यालयाने सार्वजनिक गुंतवणूक मंडळाला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यास सांगितले होते.

* प्रकल्पाची वैशिष्ट्ये

* भारतमाला कनेक्टिंग इंडिया कार्यक्रमाबाबत पंतप्रधान की या प्रकल्पात ९००० किलोमीटरचे आर्थिक मार्गाचा समावेश आहे.

* आंतरमार्ग/उपमार्ग/ ६ हजार किलोमीटर, राष्ट्रीय मार्ग क्षमता सुधारणा ५ हजार किलोमीटर/सीमावर्ती मार्ग, आंतरराष्ट्रीय संपर्क मार्ग २००० किलोमीटर, किनारपट्टी मार्ग बंदर जोड मार्ग २ हजार किलोमीटर.

* राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पातील शिलकी १० हजार किलोमीटरचा समावेश आहे. यासाठी ५.३५ लाख कोटींचा खर्च होईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.