शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

आधारामुळे भारतात डिजिटल यंत्रणा सक्षम - १४ ऑक्टोबर २०१७

आधारामुळे भारतात डिजिटल यंत्रणा सक्षम - १४ ऑक्टोबर २०१७

* केंद्र सरकारच्या आधार कार्ड योजनेमुळे लाभार्थीच्या यादीतील बनावट नावे दूर होऊन सरकारी तिजोरीतील ९ अब्ज डॉलर वाचले असा दावा आधारचे निर्माते नंदन निलेकणी यांनी केला आहे.

* योग्य डिजिटल यंत्रणा उभारल्यास तुम्ही मोठी झेप घेऊ शकता यावर आता विश्वास प्राप्त झाला आहे. इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकणी यांनी जागतिक बँकेने येथे आयोजित केलेल्या डिजिटल इकॉनॉमी या विषयावरील चर्चेत सहभाग घेतला आहे.

* देशभरातील सध्या १ अब्जाहून अधिक नागरिकांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. आधार कार्डमुळे सरकारी तिजोरीतून बनावट लाभार्थ्यांना जाऊ शकणारे ९ अब्ज डॉलर वाचले आहेत.

* एकमेव आधार क्रमांकामुळे बनावट लोकांना दूर ठेवणे शक्य झाले आहे. जवळपास ५० कोटी नागरिकांच्या बँक खात्याना त्यांचा आधार क्रमांक जोडण्यात आला आहे.

* या यंत्रणेद्वारे भारत सरकारने १२ अब्ज डॉलर इतकी रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले आहे.

* डेटा युगाच्या सध्याच्या युगामध्ये अधिकृत ओळख निधीचे सुलभ व्यवहार हस्तांतर, कागदविरहित व्यवहार हे महत्वाचे स्तर असल्याचे नंदन निलेकणी यांनी सांगितले.

* भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे एक अब्जहून नागरिक त्यांच्या मोबाईल फोनद्वारे पेपरलेस, कॅशलेस, व्यवहार करू शकतात. यामुळे देशाचा मोठा खर्च वाचतो. खर्च कमी झाला की सर्वसमावेशकता वाढते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.