सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७


* [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूर स्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

* देशातील ४७ प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघम [द्रमुक] सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे.

* इंग्लंडने स्पेनचा ५-२ असा धुवा उडवून पहिल्यांदाच फिफा १७ वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला आहे.

* आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या संग्राम दहियाने पुरुषाच्या दुहेरी ट्रॅप प्रकारात रौप्यपदक पटकावले.

* पर्यटन मंत्रालयाच्या [वारस दत्तक योजनेअंतर्गत] देशातील १४ स्मारकांच्या देखभालीसाठी ७ कंपन्यांसाठी नावे निश्चित करण्यात आली आहेत.

* बिहारमधील मुशाहर या मागास समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या वीस वर्षीय छोटी कुमारी सिंह या मुलीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

* इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन विश्वचषक स्पर्धेच्या भारताच्या जितू राय आणि हिना सिद्धूने १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकाची कमाई केली.

* देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकारने येत्या २ वर्षाकरिता २.११ लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देऊ केले आहे.

* पंजाबमध्ये कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, शेळी, मेंढी, हरीण यासारखे पाळीव प्राणी पाळायचे असल्यास विशिष्ट कर भरावा लागणार आहे.

* श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये १४ वी साऊथ एशियन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन [SAARC] विधी परिषद २०१७ आयोजित करण्यात आली आहे.

* उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये एनसीईआरटीची पुस्तके सक्तीची करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.

* पटना पायरेट्स ने गुजरात फॉर्च्युनजायंट्स च्या समोर जाऊन सलग तिसऱ्या वर्षी प्रो कबड्डीचा किताब जिंकला.

* जगातील पहिला हायड्रोजन इंधन सेल द्वारा कार्यंवित पहिला हायब्रीड इलेक्ट्रॉनिक ट्राम सुरु करण्यात आला आहे.

* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळ राज्यात पल्लीपूरम येथे एक टेक्नोसिटी परियोजनेचे उदघाटन केले.

* जैकिंडा आर्डेन न्युझीलँडच्या प्रधानमंत्रीपदी शपथ घेतली आहे. त्या सर्वात कमी वयाच्या प्रधानमंत्री झाल्या.

* गुठका बैरण च्या नावे प्रसिद्ध आणि माणिकचंद समूहाचे उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांचे निधन झाले.

* आफ्रिकी देश बुरुंडीने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालय [ICC] च्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. असे करणारा हा पहिला देश ठरला आहे.

* अलोक कुमार पटेरीया को केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल चे अतिरिक्त महानिदेशिक नियुक्त करण्यात आले.

* गगनजीत भुल्लर ने मकाऊ ओपनचा आपला आठवा आशियाई टूर टायटल पदक प्राप्त केले आहे.

* लुईस हैमिल्टन ने US ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे पदक जिंकले आहे.

* तेलंगणाच्या वारंगल येथे १२०० एकरावर निर्मित मेगा टेक्स्टाईल पार्क विकसित करण्यात येईल हा देशातला सर्वात मोठा वस्त्रोद्योग पार्क असेल.

* आफ्रिकी विकास बँकचे अध्यक्ष डॉ अकिनवूमी आयोदेजी एडीसीनाला २०१७ च्या विश्वखाद्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.