गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

भारतात जवळपास ६०% गर्भपात असुरक्षित - ५ ऑक्टोबर २०१७

भारतात जवळपास ६०% गर्भपात असुरक्षित - ५ ऑक्टोबर २०१७

* कायद्याची मान्यता असूनही भारतातील जवळपास ६०% गर्भपात असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. गर्भपाताला कायदेशीर मान्यता असलेल्या जगभरातील अनेक देशामध्ये सुरक्षित गर्भपाताचे प्रमाण जास्त आहे.

* मात्र अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, रुग्णालयाचा उदासीन कारभार आणि जागरूकतेचा अभाव यांच्यामुळे भारतातील बहुतांश गर्भपात असुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेचे गटमेकर या संस्थेसोबत जगभरात सर्वेक्षण केले होते. यामधून विविध देशामधील गर्भपाताच्या सोयीसुविधाचा आढावा घेण्यात आला होता.

* गर्भपात कितपत सुरक्षित आहेत. याची पडताळणी यातून करण्यात आली यामध्ये गर्भपातावर अनेक निर्बंध असलेल्या ६२ देशामधील असुरक्षित गर्भपातांचे प्रमाण ७५टक्के असल्याचे आढळून आले.

* तर गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिलेल्या ५७ देशामधील असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण केवळ १३% इतके झाले. पण भारतात ही परिस्थिती अजून चिंताजनक आहे.

* WHO च्या आकडेवारीनुसार २०१०-२०१४ या काळात जगभरात ५ कोटी ५७ लाख गर्भपात झाले. यामधील ३ कोटी ६ लाख गर्भपात सुरक्षित होते. तर १ कोटी ७१ लाख गर्भपात कमी सुरक्षित होते. उर्वरित गर्भपात जास्त असुरक्षित होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.