सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

शिंजो आबे यांचा जपानच्या निवडणुकीत विजय - २४ ऑक्टोबर २०१७

शिंजो आबे यांचा जपानच्या निवडणुकीत विजय - २४ ऑक्टोबर २०१७

* जपानमध्ये २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या मध्यावती निवडणुकीत पंतप्रधान शिंजो आबे यांनी शानदार विजय मिळविला आहे. आबे यांच्या नेतृत्वाखाली युतीने कनिष्ठ सभागृहात दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत. 

* तसेच याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आबे यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही देशामधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदींनी म्हटले. 

* शेजारच्या उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या आक्रमक धोरणाच्या मुकाबला करण्यासाठी देशात अधिक भक्कम जनाधार असलेले सरकार असणे आवश्यक आहे. 

* त्यासाठी लवकर निवडणूक घेणे गरजेचे होते. अशी आबे यांची भूमिका होती. त्यामुळेच संसदेचा कालावधी पुढील वर्षी संपत असून आबे यांनी जपानमध्ये मध्यावती निवडणूक घेतली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.