गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

जागतिक भूक निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर - १३ ऑक्टोबर २०१७

जागतिक भूक निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर - १३ ऑक्टोबर २०१७

* आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने [IFPIR] जाहीर केलेल्या जागतिक भूक निर्देशांकात भारत जगात १०० व्या स्थानावर आहे.

* उत्तर कोरिया, बांगलादेश, इराक या देशामध्ये भारतापेक्षा कमी कुपोषण असल्याची स्थिती निर्देशांकावरून निदर्शनास येत आहे.

* गेल्या वर्षी जागतिक भूक निर्देशांकात भारत ९७ व्या स्थानावर होता. यंदा भारताच्या स्थानात ३ स्थानाची घसरण झाली आहे.

* भारतातील भूक निर्देशांक ३१.४ इतका असून, भारताचा समावेश गंभीर परिस्थिती असलेल्या देशांच्या यादीत करण्यात आला आहे.

* भारताच्या असमाधानकारक कामगिरीचा फटका दक्षिण आशियाला बसला आहे. जागतिक भूक निर्देशांकात आकडेवारी तयार करताना एकूण ११९ देशांमधील स्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे.

* यामध्ये भारताला १०० वे स्थान मिळाले आहे. दक्षिण आशिया प्रांताचा विचार केल्यास भारताची स्थिती केवळ अफगाणिस्थान आणि पाकिस्तानच्या तुलनेत चांगली झाली आहे.

* २०१४ मध्ये भारत ५५ व्या स्थानावर होता. मात्र गेल्या तीन वर्षात कामगिरी अत्यंत निराशाजनक झाल्याचे चित्र आहे. भारतातील बालकांची शारीरिक स्थिती अत्यंत निराशाजनक आहे.

* मुलांमधील कुपोषण ही भारतातील मुख्य समस्या असून त्यामुळेच या निर्देशांकात भारताचे स्थान घसरले आहे. भारतातील ५०% संपत्ती १% अतिश्रीमंत लोकांकडे एकवटली आहे.

* भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धान्य उत्पादक देश आहे. असे असतानाही अर्धपोषित लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

* चिली, क्युबा, तुर्कस्तान या देशांनी पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवले आहे. चाड व सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हे देश सर्वाधिक वाईट ठरले आहेत.

* नेपाळ ७२, म्यानमार ७७, बांगलादेश ८८, श्रीलंका ८४, चीन २९, पाकिस्तान १०६, उत्तर कोरिया ९३, इराक ७८ अशी सर्व यादी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.