सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

वाय.सी. मोदी एनआयएचे नवीन प्रमुख - ३१ ऑक्टोबर २०१७

वाय.सी. मोदी एनआयएचे नवीन प्रमुख - ३१ ऑक्टोबर २०१७

* वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय सी मोदी यांनी राष्ट्रीय तपास संस्थेचे एनआयए प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत.

* गुजरात दंगलीप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकात त्यांचा समावेश होता.

* शरद कुमार यांच्या जागी वाय सी मोदी यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेची संबंधित प्रकरणाचा तपास करणारी ही भारतातील सर्वोच्च संस्था आहे.

* योगेश चंद्र मोदी हे हरियाणाचे असून आसाम मेघालय १९८४ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत.

* जम्मू काश्मीरमधील दहशतवादी समर्थकांनी दगडफेक याप्रकरणी चौकशी चालू असताना मोदी यांच्या हाती एनआयएची सूत्रे आली आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.