मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

मंत्रिमंडळ निर्णय - महापालिकांना आता ७५% वाढीव विकास निधी - ११ ऑक्टोबर २०१७

मंत्रिमंडळ निर्णय - महापालिकांना आता ७५% वाढीव विकास निधी - ११ ऑक्टोबर २०१७

* राज्यातील अ ते ड वर्गातील महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधाच्या विकासासाठी देण्यात येणारा निधी ५० टक्क्यावरून ७५% टक्के करण्यात आला आहे.

* या योजनेच्या सुधारित वित्तीय आकृतिबंध आणि मार्गदर्शक तत्वांना मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

* महापालिकांच्या मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासकामासाठी सध्याच्या निकषानुसार राज्यातील २७% महानगरपालिका ५०% वाटा उचलतात. तर राज्य सरकार त्यांना ५०% अनुदान देते.

* त्यानुसार या योजनेमध्ये अनुदान देताना अ प्लस वर्गातील एका महानगरपालिकेसाठी राज्य सरकार आणि महापालिका यांचा समसमान म्हणजे ५०% वाटा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.

* अ ते ड वर्गातील एकूण २६ महानगरपालिकांसाठी राज्य सरकार ७५% अनुदान देणार आहे. संबंधित महापालिकांना २५% वाटा द्यावा लागणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.