मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

एकदिवसीय सामन्यात ३१ शतके पूर्ण करणारा विराट जगातील दुसरा फलंदाज - २४ ऑक्टोबर २०१७

एकदिवसीय सामन्यात ३१ शतके पूर्ण करणारा विराट जगातील दुसरा फलंदाज - २४ ऑक्टोबर २०१७

* टीम इंडियाचा कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय [ODI] सामन्यात आपल्या कारकिर्दीतले ३१ वे शतक पूर्ण करत सर्वाधिक शतकांचा किताब मिळवणाऱ्या खेळाडूच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

* यासोबत कोहलीने पूर्वी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे.

* रिकी पॉंटिंगच्या नावे ३० शतके आहेत. यादीत पहिल्या स्थानी ४९ शतकासह सचिन तेंडुलकर आहे. मुंबईत खेळल्या जात असलेल्या भारत - न्यूझीलँड तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना विराटने आपले ३१ वे शतक पूर्ण केले.

* ३१ शतके करताना विराट हा सर्वात जलद गतीने शतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर सचिनचा क्रमांक लागतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.