गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

राज्यात उडान योजनेला १५ डिसेंबरपासून सुरवात - २७ ऑक्टोबर २०१७

राज्यात उडान योजनेला १५ डिसेंबरपासून सुरवात - २७ ऑक्टोबर २०१७

* राज्यातील उडान सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. १५ डिसेंबरपासून नाशिकप्रमाणेच औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूरसाठी विमानसेवा सुरु करण्यात येईल.

* राज्यातील केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने वर्षभरापूर्वी उडान योजनेची घोषणा केली होती. छोटी विमानतळे मोठ्या विमानतळांना जोडणे हे त्यामागचा उद्देश आहे.

* या योजनेअंतर्गत नाशिकसह, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आदी शहरे मुंबई विमानतळाशी जोडण्यात येणार आहेत.

* या योजनेअंतर्गत पुढील विमान सेवेचे मार्ग सुरु करण्यात येतील. मुंबई-नाशिक, पुणे-नाशिक-मुंबई, मुंबई-औरंगाबाद-मुंबई, मुंबई-कोल्हापूर-मुंबई,मुंबई-जळगाव-मुंबई, मुंबई-सोलापूर-मुंबई यासारख्या मार्गाचा समावेश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.