शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

शांततेचा २०१७ नोबेल आयसीएन अणवस्त्र संस्थेला जाहीर - ७ ऑक्टोबर २०१७

शांततेचा २०१७ नोबेल आयसीएन अणवस्त्र संस्थेला जाहीर - ७ ऑक्टोबर २०१७

* जगातील महासंहारक अणवस्त्र नष्ट व्हावीत म्हणून आंतरराष्ट्रीय मोहीम चालवणाऱ्या इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लिअर वेपन्स [ICAN] या स्वयंसेवी संस्थेला देण्यात आला आहे. 

अणवस्त्र वापरणानंतर निर्माण झालेली होणाऱ्या भीतीदायक परिस्थितीची जाणीव जगाला करून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नासाठी या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येत आहे. असे नॉर्वेच्या नोबेल समितीने स्पष्ट केले आहे.

* ओस्लो येथे १० डिसेंबरला होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदा शांततेच्या नोबेलसाठी २१५ व्यक्ती तर, १०३ संस्थांची नावे यादीत होती. त्यातून आयसीएन या संस्थेची निवड झाली.

* पॉप फ्रान्सिस, सौदी अरेबिया, ब्लॉगर रैफ बदावी, इराणचे परराष्ट्रमंत्री मोह्हमद जावेद जारिफ हे या शर्यतीत होते.

* आयसीएन ही स्वयंसेवी संस्था असून, जगभरातील १०१ देशामध्ये काम करते. या संस्थेची स्थापना १० वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे करण्यात आली.

* स्वित्झर्लंडमधील जिनिव्हामध्ये संस्थेचे मुख्यालय आहे. अणुबॉम्बच्या वापरामुळे मानवावर होणाऱ्या परिणामांबाबत तळागाळापर्यंत जनजगृती करण्याचे मोठे काम आयसीएन संस्था करत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.