सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

जगात पॉर्न व्हिडीओ पाहण्याच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर - ३० ऑक्टोबर २०१७

जगात पॉर्न व्हिडीओ पाहण्याच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर - ३० ऑक्टोबर २०१७

* भारतात पॉर्न पाहणाऱ्याची संख्या दुपटीने वाढली आहे. स्वस्त स्मार्टफोन आणि मोफत डेटामुळे पॉर्न पाहणाऱ्याची संख्या वाढत असल्याचं समोर आलं आहे.

* पॉर्नहब वेबसाईटचे आकडे धक्कादायक आहेत. भारतात पॉर्न पाहण्याची सरासरी वेळ ८.२२ मिनिट आहे. तर प्रतिदिन पॉर्नवेबसाईटला भेट देण्याची सरासरी वेळ ७.३२ आहे.

* बीबीसी हिंदीने ऍनालिटिक्स कंपनी विडुली च्या संस्थापक आणि सीईओ सुब्रत कौर यांच्याशी बातचीत करून याबाबातच वृत्त दिल आहे.

* अमृतसर, लखनौ, अलपुझा आणि त्रिचूर यासारख्या शहरामध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित फाईल्स शेअर करण्याचं प्रमाण जास्त आहे.

* निमशहरामध्ये पोर्नोग्राफी सर्च करण्याचं आणि पाहण्याचं प्रमाण जास्त आहे. जानेवारी २०१६ मधील एका रिपोर्टनुसार, पॉर्न पाहणाऱ्याच्या यादीत अमेरिका आणि इंग्लडनंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

* भारताने कॅनडालाही मागे टाकले आहे. सरकारने पॉर्न साईटवर बंदी आणण्यासाठी पावलं उचलली होती. ८०० पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात आली.

* मात्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. मोबाईलवर पॉर्न पाहणं सुरक्षित नसल्याचं २०१५ साली एका रिपोर्टमधून समोर आलं होत.

* या माध्यमातून हॅकर्स युझर्सकडून डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती चोऊ शकतात. इंटरनेटवर जेवढा कन्टेन्ट आहे. त्यापैकी ३७ टक्के पॉर्न आहे.

* असे ऑप्टनेम संस्थेने २०१० साली आपल्या अभ्यासात म्हटलं होत. मात्र २०१७ पर्यंत स्वस्त स्मार्टफोन आणि मोफत डेटामुळे ही आकडेवारी वाढतच चालली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.