शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

मुंबई शहराच्या पर्यटनासाठी होप ऑन होप बस सेवा सुरु - २२ ऑक्टोबर २०१७

मुंबई शहराच्या पर्यटनासाठी होप ऑन होप बस सेवा सुरु - २२ ऑक्टोबर २०१७

* मुंबई पाहायला आलेल्या पर्यटकांना आता पर्यटनाच्या एकाच बसवर अवलंबून राहून ठराविक वेळेत पर्यटन पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.

* राज्य पर्यटन विभाग [होप ऑन होप ऑफ] होहो बस सुरु करणार आहे. त्यात रेस्टोरंट असणार आहे. मुंबई पर्यटनासाठी दिवसभरासाठी एकदा तिकीट काढल्यावर व आलिशान बसमधून कधीही प्रवास करता येणार आहे.

* अशा प्रकारची [होप ऑन होप ऑफ] बस सेवा दिल्ली आणि गोवामध्ये सुरु झालेली आहे. पण मुंबईच्या होहो बसमध्ये एसी, रेस्टोरंट, टॉयलेटची सुविधा असणार आहे.

* विशेष म्हणजे मुंबईचे पर्यटन वाढावे म्हणून यासाठी बसचे तिकीट सामान्य पर्यटकांच्या आवाक्यात राहावीत यासाठी त्याची किंमत ४५० ते ५०० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

* महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना नजरेसमोर ठेवून पर्यटकांच्या सोयीच्या ११ बस बनवून घेतल्या आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.