बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

युनेस्कोच्या महासंचालकपदी ऑड्री आझूले यांची नियुक्ती - १८ ऑक्टोबर २०१७

युनेस्कोच्या महासंचालकपदी ऑड्री आझूले यांची नियुक्ती - १८ ऑक्टोबर २०१७

* संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या युनेस्कोच्या महासंचालक पदावर फ्रान्सच्या माजी सांस्कृतिक ऑड्री आझूले यांची नियुक्ती झाली आहे.

* या पदासाठी झालेल्या निवडणुकीत आझूले यांनी अंतिम टप्प्यात कतारचे उमेदवार हमाद बिन अब्दुल अझीझ अल कवारी यांचा ३० विरुद्ध २८ अशा केवळ दोन मतांनी पराभव केला.

* युनेस्कोच्या विदयमान महासंचालक आयरिना बोकोव्हा बल्गेरिया यांच्याकडून ऑड्री अझूले यांनी पदभार स्वीकारला.

* तसेच युनेस्कोने इस्त्राईलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत अमेरिकेने १३ ऑक्टोबर २०१७ रोजी युनेस्कोतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.

* पॅरिसमध्ये जन्मलेल्या आणि डाव्या विचारांची पार्श्वभूमी कुटुंबात वाढलेल्या ऑड्री आझूले या युनेस्कोने प्रमुखपद भूषविणाऱ्या पहिल्या ज्यू आहेत.

* तसेच रेने महेरू [युनेस्को महासंचालक १९६१-७४] युनेस्कोच्या महासंचालक पदावर नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या फ्रेंच नागरिक आहेत.

* त्यांचे वडील अँड्रे हे मोरोक्कोचे राजे मोहम्मद यांचे सल्लागार होते. त्यांच्या आई कटिया बरामी या लेखिका असून मोरक्कन आहेत.

* फ्रान्समधील प्रसिद्ध अशा ईएनए विद्यापीठातून त्या विशेष प्रावीण्याने पदवीधर झाल्या. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विविध विभागामध्ये त्यांनी काम केले आहे.

* फ्रान्सच्या चित्रपट उद्योगातील प्रमुख अशा सीएनजी [नॅशनल सेंटर फॉर सिनेमा अँड द मुविंग इमेजच्या अर्थविषयक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

* अशा अनेक महत्वाच्या पदावर ऑड्री आझूले यांनी याआधी कार्य केले आहे. त्यामुळे या महत्वाच्या पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.