बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार गुरुत्वीय लहरीच्या शोधाला - ४ ऑक्टोबर २०१७

भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार गुरुत्वीय लहरीच्या शोधाला - ४ ऑक्टोबर २०१७

* गुरुत्वीय लहरींचा शोध लावून संशोधनासाठी विश्वाची कवाडे खुली करणाऱ्या अमेरिकेतील तीन खगोल भौतिकशास्त्रांना यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला.

* बॅरी बॅरीश, किप थॉर्न आणि रेनर वेस अशी या तीन शास्त्रज्ञाची नावे आहेत. प्रसिद्ध आईन्स्टाईन यांनी गुरुत्वीय लहरींबाबत शतकभराआधी नोंद केली होती.

* मात्र त्यांचा प्रत्यक्ष शोध २०१५ मध्ये लागला. कृष्णविवरांची टक्कर झाल्यानंतर गुरुत्वीय लहरी निर्माण होतात. अमेरिकेतील तीन खगोल भौतिकशास्त्रज्ञानी संपूर्ण जगाला धक्का बसला आहे.

* बॅरी बॅरीश, किप थॉर्न आणि रेनर वेस यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये गुरुत्वीय लहरींचा शोध लावला. या शोधाची घोषणा फेब्रुवारी २०१६ मध्ये झाली. अनेक दशकापासून सुरु असलेल्या शास्त्रीय संशोधनातून हा शोध लागला आहे.

* आज नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या शास्त्रज्ञाना ११ लाख डॉलरचा निधी नोबेल समितीकडून मिळणार आहे.

* [ कसे आहे संशोधन ]

* किप थॉर्न आणि रेनर वेस यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 'लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल व्हेव ऑब्झरवेटरी' सुरु केली.

* याच ऑब्झरवेटरीमध्ये १.३ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावरील घडामोडीमुळे निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी नोंदविण्यात आल्या.

* कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आतापर्यंत १८ नोबेल पुरस्कार मिळाले आहे. पहिल्यांदा संस्थेला १९०१ मध्ये पुरस्कार मिळाला होता. या संस्थेला नोबेलविजेत्यांनी मोठी परंपरा लाभली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.