शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

मानवी पेशीसंबंधी महत्वपूर्ण संशोधनाला यश - ८ ऑक्टोबर २०१७

मानवी पेशीसंबंधी महत्वपूर्ण संशोधनाला यश - ८ ऑक्टोबर २०१७

* मानवी जनुकीय घड्यांचा चार मितीचा नकाशा तयार करण्यात आला असून त्यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांच्या समावेश आहे. स्टॅनफर्ड व हावर्ड विद्यापीठातील संशोधकानी हे यश मिळवले असून त्यामुळे जनुकीय आजारावर उपचारात मदत होणार आहे.

* गेली काही दशके संशोधकांना असे वाटत होते की मानवी पेशी या काही विशिष्ट पद्धतीशी एकमेकांशी संपर्कात असतात. ते एकमेकांच्या लगेच सानिध्यात येतात व गुणसूत्राभोवती कडे करतात.

* डीएनएच्या घटकांची फेररचना करता येते त्यातून पेशी कुठली जनुके क्रियाशील करायची हे ठरवत असतात. २०१४ मध्ये वैज्ञानिकांची असे सांगितले होते की वेटोळे शोधता येतात.

* यातील पहिले नकाशे हे स्थिर स्वरूपाचे होते व त्यात वेटोळ्यातील बदल टिपता आला नव्हता. पेशी केंद्र्काच्या गर्दीच्या जागेत डीएनए एकमेकांना कसे ओळखतात व पेशींना प्रतिसाद कसा नियंत्रित होतो हे आता समजत आहे.

* यापूर्वी जे नकाशे होते त्यात घडी असलेल्या जिनोमचा विशिष्ट अवस्थेत वेध घेतला जात होता पण स्थिर चित्रातून बदल कळत नव्हते त्यामुळे प्रक्रिया नेमक्या कशा घडत हे कळत नव्हते असे स्टॅनफर्डचे विद्यार्थी सुहास राव यांनी सांगितले.

* जनुकांच्या घड्यांचा अभ्यास करून त्यांच्याकडील घडणे व नष्ट होणे या दोन्ही क्रिया एखाद्या चित्रपटासारख्या पकडता येतात.

* जनुकांच्या घड्याची प्रक्रिया शोधण्यासाठी चकतीच्या आकाराच्या कोहेजीन या प्रथिनांचा वापर करण्यात आला. ते या वेटोळ्यांच्या सीमेवर होते.

* २०१५ मध्ये या वैज्ञानिकांनी डीएनए वेटोळी कोहेसिनमुळे पेशीत तयार होतात. व त्या प्रक्रियेला एक्सट्रेशन असे म्हणतात. पाठीवरच्या बॅगेच्या पट्ट्याची लांबी कमी जास्त करता येते तसा एक्सट्रॅशन प्रक्रियेचा उपयोग असतो.

* कोहेसिन नसेल तर वेटोळी नष्ट होतात असे राव यांचे म्हणणे आहे. कोहेसीन डीएनएममध्ये ज्या वेगाने फिरते त्या वेगाने कुठलेही प्रथिन फिरत नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.