रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

जगातील प्रमुख ५ महाकाय महामार्ग - ९ ऑक्टोबर २०१७

जगातील प्रमुख ५ महाकाय महामार्ग - ९ ऑक्टोबर २०१७

* पॅन अमेरिकन हायवे - या महामार्गाला जगातील लॉंगेस्टा मोटोरेबल म्हणजेच सर्वात दीर्घकाळ वाहनयोग्य राहिलेला रस्ता म्हणूनही ओळखले जाते. हा उत्तर अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत ३० हजार मैल अंतराचा आहे. गिनीज बुकमध्ये या रस्त्याची नोंद आहे. जगभरातील सर्वात लांब महामार्गामध्ये याचा पहिला क्रमांक लागतो.

* ट्रान्स सैबेरियन - हा महामार्ग रशियातील सेंट पिटर्सबर्ग सुरु होऊन क्वादीवोस्तोपर्यंत जातो. त्याचा एक भाग आशियाई हायवे नेटवर्कच्या मार्गात येतो. त्याचा आता एएच ६ म्हणून ओळखले जाते. हा जगातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याची लांबी १४,५०० किलोमीटर आहे. जागतिक स्तरावर लांबीबाबत त्याचा क्रमांक लागतो. या महामार्गाचा बराचसा भाग हा समुद्राच्या शेजारून गेलेला असल्यामुळे यावरील प्रवास अतिशय आल्हाददायक वाटतो.

* ट्रान्स कॅनडा - कॅनडातील हा हायवे ट्रान्स इंटरनॅशनल हायवे सिस्टीमच्या अंतर्गत येतो. हा महामार्ग कॅनडाच्या सुमारे १० प्रांतांना जोडणारा आहे. त्यामुळे हा महामार्ग कॅनडाची रक्तवाहिनींच आहे.

* चीनचा एक्सप्रेसवे - चीनने रविवारी आपला ४०९ किलोमीटरचा एक्सप्रेसवे खुला केला. जगात असा एकच मोठा हायवे आहे.

* गोल्डन क्वाड्रिरेटरल - भारताचा हा महामार्ग जागतिक यादीत ५ व्या स्थानावर आहे. देशातील अनेक महत्वाचे शहरे तसेच दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, पुणे, जयपूर, अहमदाबाद, भुवनेश्वर, सुरत, कानपुर अशी महत्वाचे शहरे या महामार्गावर आहेत. याला सुवर्ण चतुष्कोण असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.