रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

जगातील टॉप १०० पर्यटन स्थळात भारतातील ६ शहरे - ९ ऑक्टोबर २०१७

जगातील टॉप १०० पर्यटन स्थळात भारतातील ६ शहरे - ९ ऑक्टोबर २०१७

* जगातील टॉप १०० पर्यटन स्थळांच्या यादीत पुण्यासह देशातील चेन्नई, दिल्ली, मुंबई,कोलकाता, आणि बंगळुरू या सहा प्रमुख शहरांचा समावेश झाला आहे.

* 'मास्टरकार्ड ग्लोबल डेस्टिनेशन सिटीज इंडेक्स २०१७' च्या अहवालामध्ये ही माहिती दिली आहे. भविष्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि स्मार्ट नेटवर्क यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

* जगभरातील १३२ शहरांचा अभ्यास केल्यानंतर त्या शहरामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने वर्षभराच्या कालावधीतील उलाढालीच्या माहितीच्या आधारे ही यादी तयार केली जाते.

* भारतातील फक्त चेन्नई शहर हे आशिया खंडातील टॉप टेन पर्यटन स्थळांच्या यादीत आहे. विशेष म्हणजे परदेशी पर्यटकांकडून सर्वाधिक खर्च या शहरामध्ये झाल्याचेही आढळून आले आहे.

* जगातील टॉप टेन पर्यटन डेस्टिनेशन - बॅंकॉंक, लंडन, पॅरिस, दुबई, सिंगापूर, न्यूयॉर्क, सोल, क्वालालंपूर, टोकियो, इस्तंबूल ही आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.