रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

वर्धा जिल्ह्यातील सिंदी 'रेल्वे' ड्रायपोर्टचे आज भूमिपूजन - २ ऑक्टोबर २०१७

वर्धा जिल्ह्यातील सिंदी 'रेल्वे' ड्रायपोर्टचे आज भूमिपूजन - २ ऑक्टोबर २०१७

* आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्धा जिल्ह्यातील सिंदी 'रेल्वे' ड्रायपोर्टचे आज भूमिपूजन होणार आहे.

* या ड्रायपोर्टमुळे विदर्भातील शेताचा माल आणि इतरही औद्योगिक मालाची साठवणूक आणि निर्यात करणे सोपे आणि वेगवान होईल. त्यामुळे विदर्भाचा तसेच महाराष्ट्राचा विकास होण्यास मदत होईल.

* [वर्धा जिल्ह्यातील सिंदी 'रेल्वे' ड्रायपोर्टचे वैशिट्ये]

* ३४६ एकरमध्ये ड्रायपोर्टची संकल्पना, फेज १ आणि २ ची अंतर्गत प्रस्तावित कामे, एकूण ५०० कोटीची गुंतवणूक.
* प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ५ ते १० हजार लोकांना रोजगाराच्या संधी.
* नागपूर विमानतळापासून ५० किमी अंतरावर ड्रायपोर्ट होणार.
* मुंबई, कोलकाता कॉरिडॉरशी ड्रायपोर्ट जोडण्यात येईल.
* विदर्भाच्या औद्योगिक, कृषी आणि लॉजिस्टिक क्षेत्राची भरभराट.
* तुमच्या दारापासून ड्रायपोर्टची सुविधा.
* अधिकाधिक विकास व व्यवसायाला चालना. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.