शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

मुस्लिम मुलींना विवाहासाठी देणार सरकार ५१ हजार रुपये - १४ ऑक्टोबर २०१७

मुस्लिम मुलींना विवाहासाठी देणार सरकार ५१ हजार रुपये - १४ ऑक्टोबर २०१७

* पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुस्लिम मुलींना केंद्र सरकार ५१ हजार रुपये देणार आहे. मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन दिलेला हा प्रस्ताव केंद्राच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने मंजूर केला आहे.

* आपल्या मुलीच्या शिक्षणावर खर्च करण्याऐवजी त्यांचा लवकरच विवाह करून देण्याकडे मुस्लिम पालकांचा अनेकदा कल असतो. काही वेळा मुलगी अधिक शिकली, तर तिच्या अपेक्षा वाढतील.

* तिला शिक्षित मुलगा मिळण्यास अडचणी येतील अशी भीतीही पालकांना वाटते. त्यामुळे शिक्षणावर खर्च करण्याऐवजी तिच्या विवाहासाठी पैसे जमविणे व खर्च करणे असाच विचार मुस्लिम मुलींचे पालक करतात.

* ते टाळण्यासाठी मुलींना अधिकाधिक शिक्षित करण्यासाठी मौलाना आझाद फाउंडेशन शादी शगुन योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे ठेवला होता.

* अल्पसंख्याक समाजातील मुलींनी अधिकाधिक शिक्षण घ्यावे आणि त्यांच्यात प्रगल्भता आल्यावर त्यांचे विवाह व्हावेत या हेतूने ही योजना आहे.

* प्रथम १२ वी नंतर ही योजना होती आता शगुन योजनेची अट पदवी करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.