गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

भारतमाला योनेअंतर्गत महाराष्ट्रात उभारणार १२ आर्थिक कॉरिडॉर - २६ ऑक्टोबर २०१७

भारतमाला योनेअंतर्गत महाराष्ट्रात उभारणार १२ आर्थिक कॉरिडॉर - २६ ऑक्टोबर २०१७

* भारतमाला योजनेअंतर्गत देशभरातील पुलांच्या सर्वेक्षण योजनेतील यादीत देशातील दिड लाख पुलाचे काम तसेच या योजनेअंतर्गत विविध भागांना जोडणाऱ्या ४४ प्रस्तावित आर्थिक कॉरिडॉरपैकी १२ कॉरिडॉर महाराष्ट्रातून जाणार आहेत.

* महाराष्ट्रातून जाणाऱ्या या आर्थिक कॉरिडॉरमुळे आठ राज्यांशी महाराष्ट्राचा संबंध जोडल्या जाणार आहे.

* राज्यातील १२ आर्थिक कॉरिडॉरमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना, नागपूर, अकोला, रत्नागिरी, धुळे, पुणे, सोलापूर, जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश असेल.

* देशात अशा प्रकारचे ४४ आर्थिक कॉरिडोर प्रस्तावित करण्यात आले त्यापैकी १२ महाराष्ट्र राज्यातून जाणार आहेत.

* देशातील प्रस्तावित २४ मालवाहतूक तळासाठी राज्यातील ९ शहरे निश्चित करण्यात आले आहेत. त्यात मुंबई, मुंबई उपनगर, जवाहरलाल नेहरू, जेएनपीटी बंदर, मुंबई बंदर, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर आणि नाशिक अशा शहरांचा समावेश आहे.

* मुंबई - कोलकाता [१८५४ किमी], मुंबई -कन्याकुमारी [१६१९ किमी], मुंबई - आग्रा [९६४ किमी], पुणे - विजयवाडा [९०६ किमी], सुरत - नागपूर [५९३ किमी], सोलापूर - नागपूर [५६३ किमी], इंदोर - नागपूर [४६४ किमी], सोलापूर - बेल्लारी - गुत्ती [४३४ किमी], हैद्राबाद - औरंगाबाद [४२७ किमी], नागपूर - मंडी दाबवली [३८७ किमी], सोलापूर - मेहबूबनगर [२९० किमी], पुणे - औरंगाबाद [२२२ किमी]. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.