बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

गायक टी एम क्रिष्णा यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता सन्मान - १७ ऑक्टोबर २०१७

गायक टी एम क्रिष्णा यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता सन्मान - १७ ऑक्टोबर २०१७

* कर्नाटक गायक टी एम क्रिष्णा यांना वर्ष २०१५ आणि २०१६ साठी ३० व्या इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

* रॅमन मॅगेसेसे प्राप्तकर्ते टी एम क्रिष्णा यांना हा सन्मान ३१ ऑक्टोबर रोजी सोनिया गांधी यांच्या पुण्यतिथीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते दिला जाईल.

* टी एम क्रिष्णा हे भारतीय शास्त्रीय संगीतात कर्नाटक परंपरा जपणारे एक प्रमुख गायक आहेत. तसेच संगीत क्षेत्रात सर्वाना जागा मिळवून देण्यासाठी झटणारे एक कार्यकर्ता आहेत.

* १९८५ साली काँग्रेस पक्षाद्वारे इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराची स्थापना करण्यात आली. १० लाख रोख आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

* भारताच्या विविध समाज आणि संस्कृतीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, समज आणि सहभाग वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी ३१ ऑक्टोबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.