सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

गौरी लंकेश यांना ऍना पोलितस्कया पुरस्कार जाहीर - १० ऑक्टोबर २०१७

गौरी लंकेश यांना ऍना पोलितस्कया पुरस्कार जाहीर - १० ऑक्टोबर २०१७

* कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांना त्यांच्या मृत्यूनंतर जगातील मानाचा समजला जाणारा ऍना पोलितस्कया पुरस्कार जाहीर झाला आहे.

* ऍना पोलितस्कया या रशियाच्या निर्भीड शोध पत्रकार होत्या. तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या.

* रशियातील भ्रष्टाचार आणि जनतेवर होणारे अन्याय यांना त्यांनी वाचा फोडली होती. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांची मॉस्कोमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

* त्यानंतर त्यांच्या पत्रकारितेची आणि सामाजिक कार्याची जाणीव म्हणून शोध पत्रकारितेमधील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्यात येतो.

* जे पत्रकार लढतात, भूमिका मांडतात त्यावर ठाम राहतात आणि निर्भीड लेखन करतात, त्या सगळ्यासाठी हा पुरस्कार महत्वाचा आहे.

* ऍना पोलितस्कया पुरस्कार मिळवणाऱ्या गौरी लंकेश या पहिल्याच भारतीय पत्रकार ठरल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.