बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

जॉर्ज सॉण्डर्स यांना २०१७ चा मॅन बुकर पुरस्कार जाहीर - १९ सप्टेंबर २०१७

जॉर्ज सॉण्डर्स यांना २०१७ चा मॅन बुकर पुरस्कार जाहीर - १९ सप्टेंबर २०१७

* अमेरिकी कथालेखक जॉर्ज सॉण्डर्स यांनी आपल्या चार दशकाच्या लेखन कारकिर्दीत लिहिलेल्या [लिंकिंग इन दी बाडरे] या प्रदीर्घ कादंबरीला यंदाचा म्हणजेच २०१७ सालचा ब्रिटनमधील मॅन बुकर पुरस्कार जाहीर झाला. 

* या पुरस्काराच्या परीक्षक मंडळाने त्यांची ही कादंबरी अत्यंत परिपूर्ण असल्याचे म्हटले आहे. या कादंबरीत अब्राहाम लिंकन यांचा ११ वर्षाचा मुलगा विली याच्या मृत्यूची कथा शेकडो लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रभावीपणे कथन करण्यात आली. 

* वर्णनात्मक शैली अत्यंत वेधक असून यात सगळा कथापट प्रभावीपणे रेखाटला आहे. असे परीक्षक मंडळाच्या अध्यक्षा लोला यंग यांनी लंडन येथील पुरस्कार कार्यक्रमात सांगितले. 

* सॉंडर्स यांनी बरीच दशके फक्त लघुकथा, मुलांची पुस्तके लिहिली असून पत्रकारितेत मुशाफिरी केली आहे. २००९ मध्ये त्यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस् लेटर्स अँड लेटर्स पुरस्कार मिळाला होता. त्यांचे एक पत्रकारी तेवरचे पुस्तक आणि तीन कथासंग्रह गाजले आहेत. 

* यंदाच्या बुकर पुरस्काराच्या शर्यतीत ३ अमेरिकी व ३ ब्रिटिश लेखक होते. १९६९ मध्ये हा पुरस्कार सुरु करण्यात आला असून तो २०१४ साली अमेरिकेसाठी खुला करण्यात आला. 

* गेल्या वर्षी २०१६ साठी अमेरिकी लेखक पॉल बेट्टी यांना हा पुरस्कार मिळाला होता. [दी सेलआउट] या कादंबरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 

* ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले अमेरिकी लेखक असून आता जॉर्ज सॉण्डर्स यांच्यामुळे सलग दुसऱ्यांदा अमेरिकी लेखकाने पुरस्कार पटकावला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.