मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी - ११ ऑक्टोबर २०१७

दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी - ११ ऑक्टोबर २०१७

* राजधानी दिल्लीत फटाके विक्रीवर घातलेली बंदी १ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

* या निर्णयामुळे दिल्ली आणि नॅशनल कॅपिटल रिजन एनसीआर भागात दिवाळी दरम्यान फटाके विक्री करता येत नाही.

* दिल्लीत आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटक्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते.

* म्हणूनच ११ नोव्हेंबर २०१६ पासून दिल्लीमध्ये फटाके विक्रीवर आणि ते वाजवण्यावर सुप्रीम कोर्टाकडून बंदी घालण्यात आली आहे.

* त्यानंतर फटाक्यांचे उत्पादक विक्रेते व परवानाधारक यांनी केलेली विनंती मान्य करून न्यायालयाने विक्रीवरील ही बंदी तहकूब केली होती.

* दिल्लीत थंडीच्या महिन्यात हवेचे प्रदूषण, श्वास, घेणेही मुश्किल व्हावे एवढे वाढते. दिवाळीत फाटकांच्या धुराने परिस्थिती आणखी बिकट होते.

* नागरिकांनी केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार केला आणि बंदी तहकूब करण्याचा आधीचा निर्णय १ नोव्हेंबर लागू होईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.