बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

देशात मुंबईकर सर्वाधिक तणावग्रस्त - १२ ऑक्टोबर २०१७

देशात मुंबईकर सर्वाधिक तणावग्रस्त - १२ ऑक्टोबर २०१७

* भारतीय महानगरांमधील बहुतांश कर्मचारी तणावाखाली आयुष्य जगत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वाधिक तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांच्या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर आहे.

* मुंबईतील सुमारे ३१% कर्मचारी तणावग्रस्त जीवन जगत असल्याची चिंताजनक आकडेवारी लिब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातून आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे.

* देशाची आर्थिक राजधानी २७% कर्मचारी तणावग्रस्त आहेत. बंगळुरू १४%, हैद्राबाद ११%, चेन्नई १०%, कोलकाता ७%, असा शहरांचा क्रम लागतो.

* अतिशय व्यस्त दिनक्रम, उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी असलेला दबाव, ऑफिसमधील राजकारण, ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबवून करावे लागणारे काम, वरिष्ठांचे वर्तन त्यांच्याकडून न मिळणारे प्रोत्साहन, काम आणि घर यांचे असंतुलन यामुळे देशातील महानगरातील अनेक कर्मचारी तणावाखाली जगत आहेत.

* तणावाखाली असलेले बहुतांश लोक त्यांचे मित्र आणि कुटुंबाशी याबद्दल संवाद साधत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महानगरातील कर्मचारी वर्ग मानसिक तणावाचा सामना करत असतो. लिबर्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ अरोरा यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.