सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू - २९ ऑक्टोबर २०१७

मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू - २९ ऑक्टोबर २०१७

* बनावट मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार अब्दुल करीम तेलगीचा बंगळुरूमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना २६ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला आहे.

* गेल्या काही दिवसापासून तेलगीची प्रकृती गंभीर होती. शरीरातील विविध अवयवांनी [मल्टिपल ऑर्गन फेल्युअर] काम थांबल्याने त्याचा मृत्यू झाला.

* महाराष्ट्रसह १२ राज्यात झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणात तेलगीला २००१ मध्ये अजमेरपासून अटक करण्यात आली होती.

* तेलगीने बोगस स्टॅम्प पेपर छापून ते अनेक बँका विमा कंपन्या आणि शेअर ब्रोकिंग कंपन्यांना विकले होते.

* या प्रचंड मोठ्या घोटाळ्यात अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचीहीचर्चा झाली होती. तसेच या घोटाळ्यातून तेलगीचे कोट्यवधींची कमाई केली होती.

* त्याच्या या महाघोटाळ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणात तेलगीला जानेवारी २००६ मध्ये ३० वर्षाची शिक्षा झाली होती. याशिवाय तेलगीला सुमारे २०२ कोटींचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता.

* तेलगीचा मुद्रांक घोटाळा व हर्षद मेहताचा रोखे घोटाळा या दोन्ही गाजलेल्या घोटाळ्याच्या सूत्रधारांचा मृत्यू तुरुंगात झाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.