सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

श्रीकांतला फ्रेंच ओपनचे जेतेपद - ३१ ऑक्टोबर २०१७

श्रीकांतला फ्रेंच ओपनचे जेतेपद - ३१ ऑक्टोबर २०१७

* इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क ओपन सुपरसिरीज पाठोपाठ भारताच्या किदाम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

* अंतिम सामन्यात श्रीकांतने जपानच्या केटा निशीमेटो याचा २१-१४,२१-१३ असा पराभव केला. फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा श्रीकांत पहिला भारतीय ठरला आहे.

* जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने या वर्षात ४ सुपरसिरीज स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहेत. अशी कामगिरी करणारा श्रीकांत हा जगातला चौथा बॅडमिंटनपटू ठरला आह.

* सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीकांतला भारताच्याचा साई प्रणीतकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.