गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा अखिलेश यादव - ६ ऑक्टोबर २०१७

समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा अखिलेश यादव - ६ ऑक्टोबर २०१७

* समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी आज पुन्हा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आता पुढील ५ वर्षे पक्षाची धुरा अखिलेश यांच्याकडे राहील.

* येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी घोषणा केली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीनवरून ५ वर्षे करण्यासाठी पक्षाच्या मूळ घटनेमध्येच बदल करण्यात आला.

* आता समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील  २०१९ मधील लोकसभा आणि २०२२ मधील विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

* समाजवादी पक्षाच्या प्रदेक्षाध्यक्षांना कार्यकाळही ५ वर्षे करण्यात आला असून नरेश उत्तम यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.