बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

गुरुत्वीय लहरीबरोबर गॅमा किरणांचा शोध - १७ ऑक्टोबर २०१७

गुरुत्वीय लहरीबरोबर गॅमा किरणांचा शोध - १७ ऑक्टोबर २०१७

* दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरुत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणाऱ्या गॅमा किरणांचा [प्रकाश किरण] एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञ यांना पहिल्यांदाच शोध घेण्यात यश मिळाले आहे. 

* दोन न्यूट्रॉन ताऱ्यांची ही पहिली धडक टिपता गुरुत्वलहरी या निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. 

* या आईन्स्टाईन यांच्या भाकितालाही भक्कम पुरावा मिळाला आहे. या शोधामध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांचे महत्वाचे योगदान आहे. 

* दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या धडकेची घटना आपल्यापासून केवळ १३ कोटी प्रकाशवर्ष दूर घडल्यामुळे गुरुत्वलहरींचे आतापर्यंतचे सर्वात ठळक निरीक्षण नोंदविले गेले आहे. 

* यापूर्वी चारवेळा गुरुत्वीय लहरींचा शोध लागला असला तरीही त्या आपल्यापासून खूप दूर अंतरावर होत्या. ही घटना पहिल्यांदाच पृथ्वीपासून इतक्या जवळ घडल्याने गॅमा किरणांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. 

* या किरणांचा विस्फोट उपग्रहस्थित विविध दुर्बिणीतून गुरुत्वलहरीच्या निरीक्षणांनंतर केवळ दोन सेकंदाच्या फरकाने टिपला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.