सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

विधवेशी विवाह केल्यास मध्यप्रदेश सरकारचे २ लाखाचे प्रोत्साहन - १० ऑक्टोबर २०१७

विधवेशी विवाह केल्यास मध्यप्रदेश सरकारचे २ लाखाचे प्रोत्साहन - १० ऑक्टोबर २०१७

* मध्यप्रदेश सरकार विधवेशी लग्न करणाऱ्याना २ लाख रुपये देणार आहे. मध्य प्रदेशच्या सामाजिक न्याय विभागाने विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी हा आदेश जाहीर केला.

* यासाठी विधवा महिलेचे वय हे ४५ वर्षापेक्षा कमी असले पाहिजे. तसेच याचवर्षी जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विधवा महिलांच्या दुसऱ्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण बनवण्यास सांगितले होते.

* सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेनंतर मध्य प्रदेश सरकरने ही योजना राबविली आहे. एखाद्या सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

* देशात १८५६ मध्ये विधवा विवाहाला वैध ठरवण्यात आले होते. मध्य प्रदेश सरकारने ही योजना लागू करण्यासाठी प्रति वर्षी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.