गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी - २० ऑक्टोबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी - २० ऑक्टोबर २०१७

* जावेद अख्तर याना संगीत क्षेत्रातील महत्वाचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रोख व सन्मान चिन्ह असे आहे.

* सेलेना सेल्वकुमार हिने मिस्त्रचे ज्युनिअर कॅडेड टेबल टेनिस ओपन २०१७ चे स्वर्ण पदक जिंकले.

* १२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१७ यादरम्यान जपानच्या ससेबो येथे [पॅसेक्स-PASSEX] हा भारत-जपान संयुक्त सागरी सराव आयोजित करण्यात आला.

* १३ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित दोन दिवसीय ४८ वी राज्यपालांची परिषद संपन्न झाली.

* भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास येथे नॅशनल सेंटर फॉर कम्बशन [ज्वलन] विषयावरील जगातील सर्वात मोठे संशोधन केंद्र उघडण्यात आले आहे.

* चेन्नईमधील अन्ना विद्यापीठ परिसरात आयोजित [भरतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव IISF] दरम्यान जीवशास्त्राविषयी सर्वात मोठा वर्ग घेण्याचा नवा गिनीज विश्वविक्रम बनविण्यात आला.

* तामिळ लेखक आणि दलित कार्यकर्ते प्रा कांचा इलैया लिखित [सामाजिक स्मगलुरू कोमातोल्लू] प्रसिद्ध पुस्तक प्रसिद्ध झाले.

* पृथ्वी असलेल्या सौरमालिकेमध्ये निश्चितपणे आणखी एक नववा ग्रह असल्याची माहिती नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञानी दिली आहे.

* २०१८ मध्ये भारतीय मोबाईल स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या तब्बल ५३ कोटीपर्यंत पोहोचेल असा अंदाज अमेरिकास्थित झेनिथ या एजन्सीने व्यक्त केला आहे. भारत जगात अमेरिकेला मागे टाकून २ ऱ्या स्थानावर येणार आहे.

* स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या एका सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात जणधन बँक खाती उघडल्यामुळे तंबाखू आणि दारू सेवनात घट झाल्याचे आढळून आले आहे.

* भारतीय लष्कराने चीनलगतच्या सीमेवर ऑपरेशन कमांडची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. डोकलाममधील दोन महिन्यांच्या तणावानंतर आता चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जोरदार तयारी केली आहे.

* मोहन धारिया यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ नागपूरच्या वनराई फाउंडेशन तर्फे दिला जाणारा राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ सिंग यांना ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

* प्रतिष्ठित भारतीय वकील अजय राजू यांना तिसऱ्या भारत अमेरिकी बाजार समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

* जगातील प्रामाणिक ब्रॅण्डसाठी केलेल्या एका सर्वेक्षणात भारतातील लोक गुगलला सर्वात प्रामाणिक ब्रँड मानतात. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, मारुती सुझुकी, आणि अँपल हे ब्रँड आहेत. जगात अमेझॉन क्रमांक एकवर आणि अँपल क्रमांक दोन वर आहे.

* भारताची राजधानी दिल्ली हि महिलांच्या अत्याचाऱ्याच्या संदर्भात जगात सर्वात वाईट शहर म्हणून गणल्या जाते.

* [बियॉन्ड द ड्रीम गर्ल] हे हेमा मालिनीचे आत्मकथा मांडणारे पुस्तक त्यांच्या ६९ व्या वाढदिवसा निमित्त त्याचे विमोचन करण्यात आले.

* ग्रीसमध्ये आयोजित लिटिल मिस वर्ल्ड २०१७ च्या स्पर्धेत भारतीय १२ वर्षाच्या पूर्वी जी बी हिला सर्वोत्कृष्ट परफॉर्मरने सन्मानित करण्यात आले.

* माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपले नवीन पुस्तक [द कोएलिशन इयर्स] या पुस्तकाचे विमोचन केले या पुस्तकात त्यांनी १६ वर्षाच्या देशाच्या राजकारणातील चढउताराचे वर्णन केले आहे.

* INS - किलटन या स्वदेशी निर्मित पाणबुडीचे भारताच्या केंद्रीय रक्षामंत्री निर्मला सीतारामण यांच्या द्वारे भारतीय नौसेना यांच्या डॉकयार्ड मध्ये आयोजन करण्यात आले.

* केरळ राज्य [हेल्थ फॉर ऑल] हे अभियान सुरु करणार आहे. देशात १०० टक्के साक्षर राज्य बनल्यानंतर आता १०० टक्के आरोग्यसंपन्न राज्य बनण्याचे सरकारचे नियोजन आहे.

* प्रसिद्ध साहित्यिक नमिता गोखले यांना शताब्दी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आसाम साहित्य सभा यांच्या द्वारे प्रदान करण्यात येते.

* मल्याळम प्रसिद्ध जीवन लेखक आणि वक्ता एम. के. सानू यांना [मातृभूमी साहित्य पुरस्कार] प्रदान करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.