रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडणार - १५ ऑक्टोबर २०१७

अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडणार - १५ ऑक्टोबर २०१७

* संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या युनेस्कोतून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने जाहीर केला आहे. 

* युनेस्कोने इस्त्राईलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

* ३१ डिसेंबर २०१८ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून तोपर्यंत अमेरिका युनेस्कोचा सदस्य राहणार आहे. 

* यामुळे अमेरिकेकडून दरवर्षी युनेस्कोला मिळणारा ८ कोटी डॉलरचा [सुमारे ५२० कोटी रुपये] निधी मिळणार नाही. 

* पॅलेस्टाईन व्याप्त हेब्रॉनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा न देणे, ट्रम्प आणि इस्त्रायलने घेतलेल्या काही निर्णयाचा युनेस्कोने केराची टोपली दाखविल्याने निर्माण झालेल्या वादामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. 

* याआधी रोनाल्ड रेगन राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेने युनेस्कोचे सदस्यपद सोडले होते. यानंतर जॉर्ज डब्लू बुश यांच्या काळात पुन्हा अमेरिका युनेस्कोची सदस्य झाली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.