शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

सॅमसंगचे उपाध्यक्ष कॉन ह्युन यांचा राजीनामा - १४ ऑक्टोबर २०१७

सॅमसंगचे उपाध्यक्ष कॉन ह्युन यांचा राजीनामा - १४ ऑक्टोबर २०१७

* सॅमसंग इलेक्ट्रानिक्स मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कॉन ओ ह्युन यांनी अचानकपणे राजीनामा दिला. 

* सॅमसंग समूहाचे वारसदार जे. वाय. ली यांच्या अटकेनंतर निर्माण झालेली नेतृत्व पोकळी या राजीनाम्यामुळे आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

* भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जे. वाय. ली यांना फेब्रुवारीमध्ये अटक झाल्यानंतर कॉन ओ ह्युन यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. 

* सॅमसंग समूहाने आज मोठा तिमाही नफा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचवेळी हा राजीनामा आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. 

* चीप व्यवसायामुळे सॅमसंग समूहाच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता असून या व्यवसायात वृद्धीची जबाबदारी कॉन यांच्याकडे होती. कॉन हे सॅमसंग समूहात दुसऱ्या क्रमांकाचे नेतृत्व म्हणून ओळखले जाते.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.