रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

आरकॉम-एअरसेल विलीनीकरण करार रद्द - २ ऑक्टोबर २०१७

आरकॉम-एअरसेल विलीनीकरण करार रद्द - २ ऑक्टोबर २०१७

* रिलायन्स कम्युनिकेशन आणि एअरसेल विलीनीकरण करार संपुष्टात आणला. कंपनीने यासाठी कायदेशीर अनिश्चिततेस जबाबदार धरले.

* अनिल अंबानी यांच्या कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात दोन्ही कंपन्यांनी सहमतीने विलीनीकरण करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

* याबाबत स्पष्टीकरण देताना कायदेशीर आणि नियमातील अनिश्चितता यामुळे अतिउशीर होत आहे. त्यामुळे अनेक गोष्टींना फटका सहन करावा लागतो.

* काळानुसार दूरसंचार व्यवसायात बदल होत असतानाच विलीनीकरण्याच्या वेळखाऊ प्रक्रियांमुळे माघार घेत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

* १४ सप्टेंबर २०१६ रोजी अनिल अंबानी यांनी दूरसंचार व्यवसायाचे एअरसेलमध्ये विलीनीकरण करणार असल्याची घोषणा केली होती.

* विलीनीकरण जर झाले असते तर ही देशातील चौथ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी बनली असती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.